Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रादेशिक उपायुक्त आणि गृहपालांचा रंगला कलगीतुरा

थेट क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये केली तक्रार

exclusive stamp. exclusive round grunge sign. label मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागातील औरंगाबाद प्रादेशिक विभाग नेहमीच चर्चेत असतो. ही चर्च

सचिव भांगेंना बाईंनी दिली ‘छोबीपछाड’
विद्यार्थ्यांच्या पाठीशी आंबेडकरी जनता एकवटली
सचिव भांगेंच्या कृपाशीवार्दा मुळे बार्टीच्या महासंचालकांचा बेभान डान्स
exclusive stamp. exclusive round grunge sign. label

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागातील औरंगाबाद प्रादेशिक विभाग नेहमीच चर्चेत असतो. ही चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे या विभागाला लागलेली गैरकारभाराची वाळवी, हा विभाग पोखरून टाकतांना दिसून येत आहे. एकीकडे गैरकारभार तर दुसरीकडे प्रादेशिक उपायुक्त आणि कर्मचार्‍यामध्ये रंगलेला कलगीतुरा यातून या विभागाचा नावलौकि उजळण्याऐवजी या विभागाची बदनामीच अधिक होतांना दिसून येत आहे. सध्या प्रादेशिक उपायुक्त आणि अधिकारी कर्मचार्‍यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगतांना दिसून येत आहे. या कलगीतुर्‍यातून प्रादेशिक उपायुक्तांनी थेट औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे.

प्रादेशिक उपायुक्तांनी क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत गृहपाल असलेल्या एका महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे तक्रार देणार्‍या प्रादेशिक उपायुक्त देखील या महिला असून, त्यांनीच एका महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हा कलगीतुरा रंगण्याचे कारण काय, याचा शोध घेण्याची गरज आहे. गृहपाल पदावर कार्यरत असलेल्या या महिलेवर अरेरावी करणे, मोबाईलवर कॉल रेकॉर्ड करणे, असे आरोप करण्यात आले आहेत. मात्र या गृहपाल महिलेने सदर आरोप फेटाळून लावत क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये तसा लेखी जबाब दिला आहे. तसेच आपल्याविरोधात दिलेली तक्रार ही खोटी असून, केवळ आपल्यावर दबाव निर्माण करण्यासाठी तक्रार देण्यात आल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. तसेच आपल्याविरुद्ध कोणतीही तक्रार देण्यासाठी आधी आयुक्त समाजकल्याण यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचा जबाब दिला आहे. सामाजिक न्याय विभागातील गैरकारभाराचे वाभाडे निघत असतांना, आता कर्मचार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. प्रादेशिक उपायुक्त या जबाबदारीच्या प्रमुख पदावर कार्यरत असतांना, आपल्या विभागात समन्वयाचे वातावरण ठेवण्याची गरज असतांना, कर्मचार्‍यांना वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे हा असंतोष वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आयुक्तांनीच आता या प्रकरणाची दखल घेवून चौकशी समिती नेमण्याची गरज आहे. तरच या विभागातील गैरकारभाला आणि वरिष्ठाच्या जाचापासून कर्मचार्‍यांची सुटका होईल.

श्रीमती कळासरे यांची चौकशी करण्याची मागणी – श्रीमती वैशाली कळासरे गृहपाल या प्रादेशिक उपायुक्त असलेल्या श्रीमती जयश्री सोनकवडे यांच्यासाठी करीत असलेल्या वसुलीची चौकशी करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे हिंगोली अध्यक्ष एकनाथ खंदारे यांनी समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. श्रीमती सोनकवडे यांनी त्यांच्या बदलीसाठी अंदाजे 60 लाख रूपये सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना दिल्यामुळे सहायक आयुक्त, गृहप्रमुख, गृहपाल यांच्याकडून श्रीमती कलासरे या जबरदस्तीने वसुली करत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

COMMENTS