Homeताज्या बातम्यामनोरंजन

महाराष्ट्राची हास्यजत्रा घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुंबई- आपल्या भन्नाट विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. य

कितीही वादळे येऊ द्या, लातूरचा देशमुख वाडा तिथेच
मुदत संपल्याने सातारा झेडपीची धुरा सांभाळणार सीईओ
खा.अनिल बोंडे यांनी कृषी महोत्सवाच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा

मुंबई- आपल्या भन्नाट विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार इथे जीव ओतून काम करताना दिसतो. इथल्या प्रत्येक कलाकाराची आगळी वेगळी शैली आहे. त्याचं शैलीच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेते अरुण कदम, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदळकर, इशा डे, दत्तू मोरे, वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, समीर चौगुले या सगळ्यांनीच हटके स्किट करत प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. मात्र आता प्रेक्षकांचा हा आवडता कार्यक्रम त्यांचा निरोप घेणार आहे. गेली पाच वर्ष सतत सुरू असलेला हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हास्यजत्रेमधील अभिनेत्री प्रियदर्शिनी हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. यात हास्यजत्रेमधील कलाकार चित्रीकरण करताना दिसतायत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘शेवटच्या शेड्युलचा शेवटचा दिवस.’ दुसऱ्या फोटोला तिने लिहिलं, ‘पुन्हा दोन महिन्यांनी भेटू.’ महाराष्ट्राची हास्यजत्राचा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेत असला तरी पुन्हा २ महिन्यांनी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचा काल शेवटचा भाग चित्रित करण्यात आला. २९ मे रोजी कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रक्षेपित होणार आहे. त्यानंतर ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम याच वेळेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते सचिन खेडेकर या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. त्यानंतर पुन्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चा पुढचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

COMMENTS