Homeताज्या बातम्याशहरं

सांगली भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ निशिकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार?

इस्लामपूर / प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वीच राज्याच्या भाजप कार्यकारिणीत बदल करण्यात आले आहेत. सांगली जिल्हा भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाच्या रूप

रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी
लोणंदमध्ये तुंबलेल्या गटाराला मिळाली मुक्ती; दैनिक लोकमंथनच्या बातमीचा इफेक्ट
वाजेगाव निंबळकमध्ये अवैध गुटखा जप्त

इस्लामपूर / प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वीच राज्याच्या भाजप कार्यकारिणीत बदल करण्यात आले आहेत. सांगली जिल्हा भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाच्या रूपाने भाकरी फिरवण्यात येणार आहे. यासाठी भाजपमध्ये राजकीय हालचालीना वेग आला आहे. पक्ष निरीक्षक सुरेश हाळवणकर यांनी सांगलीत बैठक घेऊन इच्छुकांची चाचपणी केली आहे. यात इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील चाचणी परीक्षेत पास झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे सांगली जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ निशिकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार आहे.
सन 2016 सालच्या इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीने त्यांना डावलून विजयभाऊ पाटील यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. तेथूनच निशिकांत पाटील यांनी आ. जयंत पाटील यांना विरोध म्हणून विकास आघाडीशी हात मिळवणी करून थेट नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडून घेतली. या निवडणुकीत निशिकांत पाटील हे विजयी झाले. त्यानंतर इस्लामपूर विधानसभा मतदार संघात बलाढ्य अशा राष्ट्रवादी विरोधात लढा देण्यासाठी निशिकांत पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, इस्लामपूर मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेची उमेदवारी गौरव नायकवडी यांना देण्यात आली. ही निवडणूक निशिकांत पाटील यांनी अपक्ष म्हणून लढवली. या निवडणुकीत माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटील यांना दोन नंबरची मते मिळाली. या पराभवानंतर पाटील हे भाजप पक्षाचे संघटन व वाढीसाठी सक्रिय झाले. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक प्रकाश संकुलमध्ये घेतली होती. अशा प्रकारची बैठक घेणारे निशिकांत पाटील हे भाजपमध्ये एकमेव आहेत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून निशिकांत पाटील जिल्ह्यात परिचित आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी जि. प. चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रत्येक तालुक्याला संधी दिली पाहिजे. इच्छुक उमेदवाराची राजकीय ताकद, पक्षासाठी आर्थिक भार उचलण्याची तयारी असणार्‍यांना संधी देण्याची मागणी भाजप नेत्यांनी पक्ष निरीक्षक सुरेश हाळवणकर यांच्यासमोर बैठकीत केली आहे.
एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्हाध्यक्ष निवड करण्यात येणार आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकत्र करण्याची क्षमता, हवी ती मदत, पाठबळ देण्याची तयारी ही निशिकांत पाटील यांच्याकडे असल्याने यांचाच विचार केला जाणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात जोर धरू लागली आहे. त्यामुळे सांगली जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ निशिकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार.

COMMENTS