Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सासर्‍याने जावयाच्या डोक्यात घातला विळा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः जनावरांना चारा का आणला नाही. अशी विचारणा पतीने पत्नीला केली असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. मुली बरोबर जावई वाद घाली

शेतकर्‍यावर गावठी कट्टयाने झाडल्या सहा गोळ्या
कुसडगाव जलजीव योजनेचा चुकीचा सर्वे रद्द करा
संगमनेर शहरासाठी इंटरचेंज ठेवा : आमदार तांबे

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः जनावरांना चारा का आणला नाही. अशी विचारणा पतीने पत्नीला केली असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. मुली बरोबर जावई वाद घालीत असल्याचा  राग आल्याने सासर्‍याने जावयाच्या डोक्यात विळा मारुन जखमी केल्याची घटना राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथे घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नितीन चार्लस लोंढे, वय 41 वर्षे, रा. गुंजाळे ता. राहुरी. हे दिनांक 15 मे 2023 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांची आई, पत्नी, मुले व सासरा घरासमोर उभा होते. त्यांचे सासरे मुलीला भेटण्यासाठी आले होते. नितीन लोंढे यांची आईने त्यांना सांगीतले कि, जनावरांना चारा आणावा लागेल.तेव्हा नितीन लोंढे यांनी त्यांची पत्नी आलिशा यांना तु आज जनावरांना चारा का आणला नाही. अशी विचारणा केली. त्याचा त्यांना राग आल्याने दोघांमध्ये शाब्दीक वाद झाले. त्याचा सासरे बाळासाहेब रामचंद्र बारसे यांना राग आल्याने त्यांनी जावयाच्या डोक्यात विळा मारुन जखमी केले तसेच जावयाच्या आईला लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तुम्ही पुन्हा माझे मुलीला त्रास दिला तर तुम्हाला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. घटनेनंतर नितीन चार्लस लोंढे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सासरा बाळासाहेब रामचंद्र बारसे रा. कारेगाव, ता. श्रीरामपुर याच्याविरुध्द गुन्हा रजि. नं. 529/2023 भादंवि कलम 323, 324, 504, 506 प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

COMMENTS