Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जी 20’ पाहुण्यांच्या खर्चाचा महापालिकेवर भार

रंगरंगोटी, सजावटीबरोबरच आता पंचतारांकित पाहुणचार

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईमध्ये पुढील आठवडयात ‘जी 20’ची बैठक होत असून यात सहभागी होणारे 120 सदस्य महापालिका मुख्यालयाला भेट देणार आहेत. पाहुण्यांच्य

कुसडगावमध्ये राज्य राखीव पोलिस दल केंद्रासाठी  पाणीपुरवठा पाईपलाईनचे भूमिपूजन : शरद कारले
पंकजा मुंडे काँगे्रसच्या वाटेवर ?
धक्कादायक, कपडे धुवायला गेलेली महिला रक्ताच्या थारोळ्यात

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईमध्ये पुढील आठवडयात ‘जी 20’ची बैठक होत असून यात सहभागी होणारे 120 सदस्य महापालिका मुख्यालयाला भेट देणार आहेत. पाहुण्यांच्या चहापानासाठी महापालिकेने पंचतारांकित सोयी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सात-आठ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ‘जी 20’ शिखर परिषदेची पुढील बैठक मे महिन्याच्या तिसर्‍या आठवडयात मुंबईत होणार आहे. यादरम्यान आपत्कालीन जोखीम कमी करण्यासाठी काम करणार्‍या तज्ज्ञ समितीचे सदस्य 23 मे रोजी संध्याकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत पालिका मुख्यालयाला भेट देणार आहेत. महापालिकेची यंत्रणा सध्या स्वागताच्या तयारीत गुंतली आहे. चहापानाचा खर्च महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार असून त्याकरीता खास पंचतारांकित पदार्थ, सेवा देण्यात येणार आहेत. ‘जी 20’ परिषदेसाठी आधीच महापालिकेने रंगरंगोटी, रस्त्यांची सुधारणा, रोषणाई याकरीता कोटयवधी रुपये खर्च केले आहेत. त्यात पाहुणचाराच्या खर्चाची भर पडणार आहे. जुन्या इमारतीमध्ये सदस्यांची सरबराई करण्यात येणार आहे. सदस्यांना चहापानासाठी खास पंचतारांकित हॉटेलांमधील खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. त्याकरीता उंची कपबशा व चमचे असे साहित्यही वापरण्यात येईल. या सगळयावर सात ते आठ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या आहेत. वडापाव, पाणीपुरीचाही बेत परदेशी पाहुण्यांना पंचतारांकित खाद्यपदार्थ, चहा-कॉफी, उंची बिस्किटे याबरोबरच कॉन्टीनेण्टल पद्धतीचे नाश्त्याचे पदार्थ देण्यात येणार आहेत. तसेच मुंबईची खास ओळख असलेले वडापाव आणि पाणीपुरीदेखील पाहुण्यांना चाखता येणार आहे.

COMMENTS