Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निमगांव खैरी सोसायटीच्या अध्यक्षपदी माणिक भागडे

खैरी निमगांव/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुक्यातील निमगांव खैरी सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री. माणिक सोन्याबापु भागडे यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र र

प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
छ. राजर्षी शाहू को-ऑपरेटिव्ह बँकेत शाहू महाराजांना अभिवादन
दिव्याखाली अंधार… चोरांनी दाखवला पोलिसांना हिसका ; पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांचीच वाहने असुरक्षित

खैरी निमगांव/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुक्यातील निमगांव खैरी सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री. माणिक सोन्याबापु भागडे यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र रेवजी काळे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हि निवड करण्यात आली. निवडीप्रसंगी अध्यक्ष पदाची सुचना सुभाष पुंजाहरी पटारे यांनी मांडली त्यास अनुमोदन अशोक मारुती जेजुरकर यांनी दिले. तर उपाध्यक्ष पदाची सुचना संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिपक चांगदेव झुराळे यांनी मांडली त्यास अनुमोदन नानासाहेब मोहन तरस यांनी दिले. एक वर्षापुर्वी संस्थेची निवडणुक झाली होती. दरवर्षी अध्यक्ष उपाध्यक्ष पद रोटेशन पद्धतीने प्रत्येक संचालकाला देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे संस्थेच्या अध्यक्षा जयश्री संतोष भागडे तसेच उपाध्यक्ष दिपक चांगदेव झुराळे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने ह्या जागा रिक्त झाल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. पी. रुद्राक्ष निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी काम पाहीले. यावेळी संस्थेचे सचिव सचिन कदम व क्लार्क सौरभ झिंजुर्टे यांनी मदत केली. यावेळी संस्थेचे संचालक नितीन भागडे, सुभाष पटारे, दीपक झुराळे, रामदास भागडे, नानासाहेब तरस, अशोक जेजुरकर, तुळशीराम भाकरे, लहानु शेजुळ, रायभान जाधव, संचालिका जयश्री भागडे, मंगल झुराळे आणि ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

COMMENTS