Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 11 विद्यार्थ्यांना साहेबच खुशबू स्कॉलरशिप जाहीर

संगमनेर प्रतिनिधी - ग्रामीण भागात असूनही आपल्या गुणवत्तेमुळे देशात लौकिक निर्माण केलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील अकरा विद्यार्थ्यांना स

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वी करावी
मागासवर्गीय ग्रामस्थांची समशान भूमीची जागा हडप करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी – अशोक गायकवाड
एक्सपायरी संपलेल्या बाटल्यांवर नवं स्टिकर लावून रेमडेसिव्हीरची विक्री |’१२च्या १२बातम्या’ |LokNews24

संगमनेर प्रतिनिधी – ग्रामीण भागात असूनही आपल्या गुणवत्तेमुळे देशात लौकिक निर्माण केलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील अकरा विद्यार्थ्यांना सायबेज या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ट्रस्ट कडून शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास पन्नास हजार रुपये खुशबू स्कॉलरशिप जाहीर झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. व्यंकटेश यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ व्यंकटेश व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे म्हणाले की, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला नेक अ प्लस दर्जा मिळाला असून विविध शाखांचे एनबीए मानांकन झाले आहे .यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांना थेट नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देत आहेत. यावर्षी अनेक विद्यार्थी यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर नोकरीसाठी निवड झाली आहे. याचबरोबर शैक्षणिक कामकाजाकरता  कमिंस या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून अनेक विद्यार्थ्यांना रोख रकमे सहित लॅपटॉप मिळाले आहेत. तसेच महाविद्यालयाने स्वखर्चाने हुशार व पात्र विद्यार्थ्यांना अमृत मेरीटोरीस ही स्कॉलरशिप दिली असून प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये यातून या विद्यार्थ्यांना दिले जात आहेत.

सायबेज ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील डिजिटल उत्पादन करणारी कंपनी आहे. सॉफ्टवेअर व तंत्रज्ञान प्रॉडक्ट लाइफ सायकल व्यवस्थापन पुरवणाऱ्या या कंपनीचे जगभरात आठ हजार कर्मचारी असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी भरीव मदत करत आहेत. या ट्रस्टचे सीईओ आणि एमडी अरुण नाथांनी आणि त्यांच्या पत्नी श्रीमती रितू नाथांनी यांनी विद्यार्थ्यांना खुशबू स्कॉलरशिप जाहीर केली आहे.

यामध्ये कॉम्प्युटर विभागाची श्रावणी पाटोळे 60000, सुयश पवार 50000, सुरज खैरनार 50000,तेजेन्द्र सिंग पाटील 50000, वैभव पोले 50000, विकास आमले 50000, अस्मिता वाणी 50000, वेदांत नाईकवाडी 40000, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे पियूष गुंजाळ 60000, अनुराग वाकचौरे 55000 व एन टी सी विभागाची दिशा तळेकर हिला 18000 रुपयांची स्कॉलरशिप मिळाली आहे. या कामी करिअर डेव्हलपमेंटचे प्रा बी एस साबळे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.

 या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्री ताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा विवेक धुमाळ, प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश यांनी अभिनंदन केले आहे

COMMENTS