Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करणार्‍या वाहन चालकावर गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील हिरा मोती पान शॉप या दुकानासमोर रस्त्यावर मोपेड गाडी ही जाणार्‍या येणार्‍या वाहनांना अटकाव

कोपरगाव शहरात महिलेची आत्महत्या, तीन आरोपींवर गुन्हा
पैशांसाठी स्वतःच्या पत्नीला दिले मित्रांच्या तावडीत
प्राध्यापक व कर्मचार्‍यांच्या दमबाजीमुळे विद्यार्थी पडला बेशुद्ध

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर मनमाड रोडवरील प्रेमदान चौकातील हिरा मोती पान शॉप या दुकानासमोर रस्त्यावर मोपेड गाडी ही जाणार्‍या येणार्‍या वाहनांना अटकाव होईल तसेच त्यामुळे अपघात होवुन व्यक्तीला इजा होईल अशा रितीने उभी केलेली आढळून आली. या वरून वाहन चालकाविरुद्ध तोफ खाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली . या बाबतची माहिती अशी की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमत्त मिरवणुका तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने तोफखाना मोबाईल मधुन पोलीस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना सायंकाळी प्रेमदान चौक, हिरामोती पानशॉप,अ.नगर समोरील रस्त्यावर एक मोपेड गाडी व्हीटर गाडी ( क्रमांक एम एच 16 सी एच 8164 ) ही जाणार्‍या येणार्‍या वाहनांना अटकाव होईल तसेच त्यामुळे अपघात होवुन व्यक्तीला इजा होईल अशा रितीने उभारलेले दिसुन आले. त्यामुळे त्या मोपेड गाडी बाबत विचारपुस केली असता, तेव्हा तेथे मोपेड गाडीचे चालक आले असता त्याला त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नावे नवनाथ भाऊसाहेब आव्हाड, ( वय 23 वर्ष, रा. पोलीस हेडक्वार्टर,अ.नगर ) असे सांगितले.
त्यानंतर ती गाडी पोलिसांनी सुरक्षा हेतू दृष्टीने रस्त्याच्या बाजूला केली. नवनाथ आव्हाड, याने त्याच्या ताब्यातील मोपेड व्हीटर गाडी ही जाणार्‍या येणार्‍या वाहनांना अटकाव होईल तसेच त्यामुळे अपघात होवुन व्यक्तीला इजा होईल अशा रितीने उभी केली म्हणुन पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन.भां द वि कलम 283 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद केली.

COMMENTS