Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाचा पारा वाढला, टोप्यांना व गंमच्यांना सर्वाधिक मागणी

लातूर प्रतिनिधी - सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून शहरातील तसेच सर्वत्र उष्णतेचा पारा वाढला आहे. काही दिवसापासून वातावरनात बदल होत असलेले दिसून य

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी जुने शहर भागाची केली पाहणी
गोविंद तांडा येथील  शेतकर्‍यांची आत्महत्या
सोलापुरात पोलिस उपनिरीक्षकाची हत्या

लातूर प्रतिनिधी – सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून शहरातील तसेच सर्वत्र उष्णतेचा पारा वाढला आहे. काही दिवसापासून वातावरनात बदल होत असलेले दिसून येत आहे. त्यातच अनेकांना आपल्या कामानिमित्त भर उन्हात घराच्या बाहेर पडावे लागते कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्यांची व गमच्याचे तसेच डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून गॉगलसुद्धा खरेदी करताना शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक दिसून येत आहेत.
शहरांमध्ये विविध ठिकाणी टोप्यांची गमचांची तसेच गॉगलचे स्टॉल लावण्यात आले आहे. उष्णतेचा पारा वाढल्यामुळे गमज्यांना व गॉगलला आता चांगलीच मागणी आली आहे. गॉगल विक्रेते हे काही शहरातील तर काही विक्रते ग्रामीण भागातील आहे. तसेच विविध शहरातून ग्रामीण भागातून येऊन आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी गॉगलचे स्टॉल लावून विक्री करीत आहे. लातूरच्या तापमानाचा पारा 38 अंशापेक्षा अधिक असल्याचे जिवाची लाहीलाही होत आहे. धामांच्या धारा निघत आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठांना या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. या स्टॉलवर विविध गॉगल लावण्यात आले आहेत पण त्या सर्वांचे दर खिशाला परवडणारे आहेत. तसेच टोप्याही लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पुरुषांसाठी शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या स्टॉलवर उपलब्ध आहेत. त्यातच सर्वात जास्त मागणी मात्र जमच्यांना मिळत असलेले दिसून आले. सर्वांना पसंद पडेल या क्वॉलिटी मध्ये शहरतील लावलेल्या स्टॉल वर उपलब्ध आहेत. गमज्याचे दर मात्र 50 ते 100 रुपये या दराने किरकोळ विक्रेते विक्री करत आहेत, अशी माहिती किरकोळ विक्रेते सय्यद यांनी दिली आहे.

COMMENTS