Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 28 वर्षानी माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मेळावा

चाकूर प्रतिनिधी - इयत्ता बारावीच्या वर्गातील 1995 लोकमान्यं (भाई किशनराव देशमुख) महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मिलन मेळावा येथील सुप

निलंगा, औराद आणि देवणी बाजार समितीवर भाजपाची एकहाती सत्ता
हिंगोलीत भगरीमुळे 100 जणांना विषबाधा
उन्हाची तीव्रता; निसर्ग सौंदर्य आणि पशू-पक्ष्यांना जपा !

चाकूर प्रतिनिधी – इयत्ता बारावीच्या वर्गातील 1995 लोकमान्यं (भाई किशनराव देशमुख) महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मिलन मेळावा येथील सुप्रसिध्द साईनंदनवनमन मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला असून या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या मागील आठवणीला उजाळा दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वत:चा परिचय कौटुंबिक आणि शैक्षणिक पाश्वभुमि, महाविद्यालयीन आठवणी, व्यवसायिक अनुभव व भविष्यातील वाटचाल याबाबत मनोगत, मनमोकळेपणे व्यक्त करून एकमेकांची मने जिंकली.
यावेळी या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे तत्कालीन शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रा.एस.बी नवरखेले आणि प्रा. अ. ना. शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक होते. प्रा.नवरखेले यांचे समोयोचीत मार्गदर्शन झाले.या प्रसंगी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, शिक्षणांमुळे माणसाच्या जीवनात काळानुरुप बदल होत असतात. आधुनिक काळातील शिक्षण प्रणाली बदलेली आहे.आज वॉटसअ‍ॅप व फेसबुक युग आहें. विद्यार्थ्यांच्या जिवनात अनेक चढउतार येत असतात. सुख दु:ख याचा सामना करुन आपले जीवन जगावे लागते.जीवनात जगत असताना नियोजन महत्त्वाचे आहे.अर्थशास्ञी भाषेत ते म्हणाले अमर्यादित गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ साधने म्हणजेच अर्थशास्त्र आहे. आजच्या धावपळीच्या काळात माणुसकी हरवत चाललेली आहे. आपण 28 वर्षानंतर आम्हा गुरूजणांची आठवण करुन बोलवलात हिच आमच्या जीवनातील अनमोल शिधोरी आहे. यावेळी धनजय सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्रेह मित्र मिलन कार्यक्रमाची भूमिका विशद करून सर्व गुरुजनांना चरण स्पर्श करून नमन केले. सरस्वती पाटील यांनी सुत्रसंचलन तर आभार शौकत शेख यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सलीमभाई तांबोळी,अंजली कुलकर्णी, रमाकांत फुलारी, भारती गिरके, कांबळे विजय, अनुराधा शेटे, शेख नुरजहॉ, सलीम तांबोळी, शेख ताहेर, विजया गजभार, अनुपमा शेटे, शेख राशदबी, पठाण, फैमुना पठाण, विजय दराडे, धनराज सूर्यवंशी, किशोर मदनुरे, उमाकांत घोगडे, औंदबर येडले, पांडुरंग मुठ्ठे, शौकत शेख, शालु हाके, विलास वाघमारे, राजकुमार बेडके, गिरधर भेटे, कैलास गिरी, चंद्रकांत मोठेराव, शरद घुगे, बालाजी गायकवाड, देशमाने बालाजी सह जवळपास 50 विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS