लातूर प्रतिनिधी - पीक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना राज्य शासनाकडुन महात्मा फुले कर्जमुक्ती शेतकरी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाची
लातूर प्रतिनिधी – पीक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना राज्य शासनाकडुन महात्मा फुले कर्जमुक्ती शेतकरी योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाची प्रक्रिया गेल्या सात महिन्यांपासून सुरु आहे. जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 74 शेतक-यांनी अनुदानासाठी नोंद केली आहे. परंतु, शासनाकडून 1 लाख 31 हजार 946 शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. 53 हजार शेतक-यांबद्दल अद्यापपर्यंत निर्णय झाला नाही. तसेच 800 कर्जदार शेतक-यांची माहिती अद्यापपर्यंत जुळलेली नाही.
शासन निर्णयानूसार सन 2017 ते 2020 या कालावधीत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान महात्मा फुले कर्जमुक्ती शेतकरी योजनेअंतर्गत दिले जात आहे. त्यामुळे नियमितपणे कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अनुदान योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 74 हजार शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यापैकी 1 लाख 31 हजार 946 शेतकरी पात्र ठरले आहेत. महात्मा फुले कर्जमुक्ती शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत लातूर जिल्ह्याच्या चार याद्या प्रसिद्ध होऊन जिल्ह्यातील 1 लाख 13 हजार 202 शेतक-यांच्या खात्यावर 269 कोटी 11 लाख रुपये जमा झाले आहेत. अद्यापही 53 हजार 128 शेतक-यांना हे अनुदान मिळाने नाही. त्यामुळे प्रोत्साहनपर रक्कम कधी मिहणार म्हणून शेतकरी सातत्याने चौकशी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात 1 लाख 85 हजार 74 शेतक-यांनी अनुदानासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 31 हजार 946 शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले. त्यापैकी 1 लाख 28 हजार 896 शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण झाले आहेत. अद्यापही 3 हजार 32 शेतक-यांचा आधार प्रामाणिकरणासाठी अंगठा जुळेनासा झाला आहे. जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार 74 शेतक-यांनी अनुदानासाठी नोंद केली आहे. परंतू, शासनाकडून 1 लाख 31 हजार 946 शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. 53 हजार शेतक-यांबद्दल अद्याप निर्णय झाला नाही. तसेच 800 कर्जदार शेतक-यांची माहिती जुळत नाही.
COMMENTS