Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सराफा व्यापार्‍यांचे 30 लाखांचे अर्धा किलो सोनं घेऊन बंगाली कारागीर पसार.!

माजलगाव प्रतिनिधी - शहरातील पाच सराफा व्यापार्‍यांचे जवळपास अर्धा किलो सोनं घडई (डीझाई) करण्यसाठी बंगाली कारागीरला शनिवार 13 मे रोजी दिले होते. म

लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ;30 एप्रिलपर्यंत करता येणार दुरूस्ती : मंत्री अदिती तटकरे
११ महिलांचा दुर्दैवी मृत्यू | LOKNews24
मनोज जारांगे यांच्या उपोषणाला निमगाव को. ग्रामस्थांचा पाठिंबा

माजलगाव प्रतिनिधी – शहरातील पाच सराफा व्यापार्‍यांचे जवळपास अर्धा किलो सोनं घडई (डीझाई) करण्यसाठी बंगाली कारागीरला शनिवार 13 मे रोजी दिले होते. मात्र त्याने घडई (डिझाईन) न करता तो पसार झाल्याचाही घटना घडली. याबाबत सराफ व्यापार्‍यांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली असल्याचे सांगितले जात आहे या प्रकरणी मात्र अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही.
माजलगाव शहरात जवळपास दीडशे सराफा व्यापारी दुकान आहेत यातील बहुतांश व्यापारी हे ग्राहकांनी दिलेली घडई (डिझाईन) बनवण्यासाठी त्या दुकांना  ठिकाणी डिझाईन बनवण्याचे दुकान टाकून कामे करतात यातुनच प्रकारे शहरातील पाच व्यापार्‍यांनी डिझाईन बनवण्यासाठी दिलेले सोने घेऊन हा बंगाली कारागीर पसार झाला आहे यात अर्ध्याधीक सोनं उद्योपती माधवराव निर्मळ यांचे माजलगाव शहरातील निर्मळ ज्वेलरीचे अशी माहिती सदर ज्वेलरीचे दुकान चालवणारे बीड जि.प.चे माजी सभापती कल्याण आबुज यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. अर्धा किलो सोनं त्याचबरोबर मोटार सायकल क्रं.एम.एच.20/ इ एक्स 3134 जीची किंमत 80हजार रुपये आहे त्यासह तो कारागीर पसार झाला आहे. याबाबत हे व्यापारी 14मे रविवार रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी या सोन्याच्या पावत्या मागितल्याने हे सराफ व्यापारी परत पोलीस ठाण्याकडे फिरकलेच नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरीही सोन्याची चोरी झाली नाही का किंवा सराफा व्यापार्‍यांची फसवणुक झाली नाही का हे सांगावे अश्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

COMMENTS