Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे होणार प्रशिक्षण

शिक्षक भारती संघटनेचा यशस्वी पाठपुरावा

कोपरगाव प्रतिनिधी- वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

ठिबक सिंचनासाठी कर्जत तालुक्याला राज्यात सर्वाधिक आर्थिक लक्षांक- आ.रोहित पवार
इलेक्ट्रिक पोलवर काम करताना शॉक लागून एकाचा  मृत्यू  एक जखमी 
वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य : उर्मिला पवार

कोपरगाव प्रतिनिधी- वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने मागील वर्षभरामध्ये 12 वर्षे व 24 वर्ष सलग सेवेत पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे व अहमदनगर जिल्हा सरचिटणीस महेश पाडेकर यांनी दिली आहे.
या विषयी कार्याध्यक्ष मोरे व जिल्हा सरचिटणीस पाडेकर यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, कोरोना कालावधीत सुमारे एक लाख शिक्षकांचे स्प्रिंगबोर्ड पच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यानंतर 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण न झाल्याने त्यांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे लाभ मिळत नव्हते. याबाबत शिक्षक भारतीने ऑनलाइन प्रशिक्षण आयोजन करण्याची मागणी केली होती. सदरची मागणी मंजूर झाल्याने येत्या जूलै महिन्यात ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण होणार आहे. पात्र शिक्षकांनी लवकरच देण्यात येणार्‍या लिंकवर जाऊन नोंदणी पूर्ण करायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतची लिंक व परिपत्रक जाहीर केल्यानंतर आपल्याला पुढील माहिती देण्यात येणार असून सर्व पात्र शिक्षकांनी संघटनेच्या संपर्कात राहावे असे आवाहन शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS