Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे ः पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणार्‍या विजय नांगरे या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्या

स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेऊन गॅरेज चालकाची आत्महत्या
संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
ऑनलाइन गेममध्ये हरल्यानंतर तरूणाची आत्महत्या

पुणे ः पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणार्‍या विजय नांगरे या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे. संबंधित वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरील अभ्यासिकेतील पंख्याला विजय नांगरे याने गळफास घेतल्याची बाब सोमवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विजय नांगरे हा मॉडर्न महाविद्यालयात बी. एससी च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळून आली आहे. माझ्या आत्महत्येस कोणी जबाबदार नसल्याचे त्यात सांगण्यात आले आहे.याबाबतची माहिती मिळताच, विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला. याबाबत विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS