Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाच्या जिल्हा संघटकपदी दीपक परदेशी यांची नियुक्ती 

नेवासाफाटा प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाच्या जिल्हा संघटकपदी नेवासा येथील बांधकाम कामगार नेते  दीप

जामखेड शहर विकास आराखडा स्थगित करावा
आदिवासी कुटुंबीयांसाठी खावटी अनुदान मंजूर
कुकडी पाण्याबाबत दिवा विझण्यापूर्वीची धडपड बंद करावी : पप्पूशेठ धोदाड

नेवासाफाटा प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाच्या जिल्हा संघटकपदी नेवासा येथील बांधकाम कामगार नेते  दीपक रतनलाल परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष स्थापनेपासून मनसेच्या माध्यमातून केलेल्या निष्काम कार्याबद्दल व एकनिष्ठतेबद्दल दीपक परदेशी यांची अहमदनगर  जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रेश्माताई तपासे यांनी सदरचे नियुक्ती पत्र श्रीरामपूर शहर संघटक निलेश सोनवणे,तालुका संघटक विकी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपक परदेशी यांना प्रदान करण्यात आले आहे.

   दीपक परदेशी यांना जिल्हा संघटक पदाचा पदभार देतांना “नेवासा, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी” हे कार्यक्षेत्र देण्यात आले असुन नेमुन दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करताना विभागाच्या ध्येय धोरणांना सुसंगत अशी कामे करून पायाभुत सुविधांबाबत लोकोपयोगी कामे करावी तसेच आपले वर्तन हे विभागाने ठरवून दिलेल्या आचारसंहितेप्रमाणे असावे असे ही नियुक्ती पत्रात नमूद केलेले आहे.

     मनसेच्या जिल्हा संघटकपदी दीपक परदेशी यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गव्हाणे,जिल्हा संघटक विलास तालुकाध्यक्ष दिगंबर पवार,किरण शिंदे,नेवासा विभाग प्रमुख रविंद्र पिंपळे यांनी अभिनंदन केले आहे

COMMENTS