राज्यात झिका आजाराचा पहिला रुग्ण आढळला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात झिका आजाराचा पहिला रुग्ण आढळला

पुणे : करोना आजाराने एका बाजूला थैमान घातले असून आता दुसर्या बाजूला झिका आजाराने डोकेवर काढले आहे. झिका या आजाराचा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याती

नात्याला काळिमा…भावजयीवर अत्याचार, गुन्हा दाखल
केज येथील दोन विधीज्ञा वर पुण्याच्या कोयता गँगचा हल्ला
नायर रुग्णालयात विद्यार्थिनीचा छळ प्रकरणी सहाय्यक प्राध्यापक निलंबित

पुणे : करोना आजाराने एका बाजूला थैमान घातले असून आता दुसर्या बाजूला झिका आजाराने डोकेवर काढले आहे. झिका या आजाराचा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये 50 वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील पहिल्या झिका रुग्णांची नोंद झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर जवळपास साडेतीन हजार लोकसंख्या असलेलं गाव असून या महिन्याच्या सुरुवातीपासून तापाचे रुग्ण आढळून येत होते. त्यातील काही रुग्णांचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. त्यामध्ये चिकनगुनिया आणि डेंगीचा आजार काहीना असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. तर त्याच दरम्यान बेलसर गावातील एका 50 वर्षाच्या महिलेस झिका विषाणू आजारा सह चिकनगुनिया झाला असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

काय आहे झिका आजार..
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. गर्भवती महिलेस हा आजार झाल्यास होणार्‍या बाळाच्या डोक्याचा घेर कमी (मायक्रोसेफाली) असू शकतो. तथापी हे सप्रमाण सिद्ध झालेले नाही तरीही या दृष्टीने गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

COMMENTS