Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी संवाद उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी ः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार अहमदनगर शहर येथे टिळक र

जुनी पेन्शन साठी क्रांतीची ज्योत पेटवा – प्रा किसन चव्हाण
नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा.. आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ
नगर शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत

अहमदनगर/प्रतिनिधी ः वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार अहमदनगर शहर येथे टिळक रोड येथील सरस्वती सांस्कृतिक भवन येथे ओबीसी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची जिल्हा व संघटनात्मक बांधणी करण्यात आली असून अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाची जनगणनेची मागणी होत असताना देखील शासनाने याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केलेले असून ओबीसी जनगणना होत नसून ती लवकरात लवकर करण्यात यावी तसेच ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीच्या नोकर्‍या या सातत्याने डावलण्यात येत आहे.
उच्च शिक्षणातील आरक्षण देखील विद्यार्थ्यांना पूर्णपणे देता येत नाहीत या देशात ओबीसी च्या अनेक जाती आहेत उदा . माळी, नाभिक, धोबी, सुतार, लोहार, ख्रिश्‍चन, पांचाळ, कुणबी, कुंभार, तेली यासारख्या अनेक छोट्या-मोठ्या ओबीसी समूहातील जातींना डावलण्यात येत आहे. या सर्व ज्वलंत विषयावर चर्चा करण्यात आली असून वंचित बहुजन आघाडी येणार्‍या काळात बहुजन सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाखाली ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्यभर मोठे आंदोलन उभे करणार असून. ओबीसी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागोजीराव पांचाळ म्हणाले की ओबीसी जनगणना होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले तर प्रा. सोमनाथ साळुंखे व अँड. गोविंदजी दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ओबीसी चे जिल्हयातील नेते अंबादास गारुडकर, बाळासाहेब भुजबळ, संजय खामकर, हरिभाऊ डोळसे, डॉ.सुदर्शन गोरे, दत्ताशेठ जाधव, राजेश सटानकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंके, जिल्हा प्रभारी प्रा.डॉ. सुरेश शेळके, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष गलांडे, जिल्हा अध्यक्ष प्रतीक बारसे समवेत उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जठार, प्रविण अल्हाट, जिल्हा सल्लागार जिवन पारधे, जिल्हा सचिव नेटके सर, तालुका अध्यक्ष पोपट शेटे, संतोष जौजाळ, मारुती पाटोळे, ज्येष्ठ नेते पोपट जाधव, शहर उपाध्यक्ष अमर निरभवणे, अमोल काळपुंड, प्रविण ओरे आधीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS