Homeताज्या बातम्यादेश

प्रवीण सूद सीबीआयचे नवे संचालक

नवी दिल्ली ः कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभाग येथे संचालकपदी नियुक्ती झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते सीबीआयचे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी
स्वातंत्र्यदिनी 19 जणांचे देहदान संकल्प; विविध राजकीय पक्ष व संस्थांद्वारे ध्वजवंदन उत्साहात
पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वेच्या विस्तारीकरणाबाबत बैठक

नवी दिल्ली ः कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभाग येथे संचालकपदी नियुक्ती झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ते सीबीआयचे संचालक असणार आहेत. या पदाच्या नियुक्तीसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश होता.
सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार यांचा कार्यकाळ आता संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या संचालकपदाची निवड करण्याकरता उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश होता. या समितीद्वारे दोन वर्षांच्या निश्‍चित कार्यकाळासाठी अधिकार्‍याची निवड केली जाते. हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. या समितीने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांची निवड केली होती. त्यामधून कर्नाटकचे 1986 बॅचचे अधिकारी प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS