पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचे अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर शु
पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचे अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर शुक्रवारी (ता. १२) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वादळी पावसाने राज्यातून निरोप घेताच उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. राज्याच्या अनेक ठिकाणी पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. गुरुवारी राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव येथे ४४.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. दरम्यान उन्हाळी हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे.तर राज्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशापार गेला असेल आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशापेक्षा अधिक वाढ झाली असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उष्ण लाट आली होती. अकोला येथे ४३.५, धुळे ४२.० सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात सक्रिय चक्रीवादळाच्या लगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात सध्या कोरड्या हवामानाची स्थिती असून शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
COMMENTS