Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात साडेचार लाखाचे कोकेन जप्त

पुणे/प्रतिनिधी ः पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाणेर येथील अश्‍वमेध हाऊस, युक्तिका सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर एका संशयित परदेशी नागर

मराठवाडयात दोन तरूण शेतकर्‍यांच्या आत्महत्या ; औरंगाबाद आणि बीड येथील शेतकर्‍यांनी कवटाळले मृत्यूला
हंडाभर पाण्यासाठी चौघांवर चाकू हल्ला एकाचा मृत्यू | LOK News 24
डोंबिवलीतून  १० लाख रुपये किंमतीच घातक रसायनांचा साठा जप्त

पुणे/प्रतिनिधी ः पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाणेर येथील अश्‍वमेध हाऊस, युक्तिका सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर एका संशयित परदेशी नागरिकास पकडले आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी चार लाख 48 हजार रुपये किमतीचे 22 ग्रॅम 40 मिलिग्रॅम कोकेन, एक मोटार सायकल, 54 हजार रुपये रोख आणि चार मोबाईल हँडसेट असा एकूण पाच लाख 69 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ट्रोवर बेंजामिन नोह (वय -43) असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा दक्षिण आफ्रिका येथील रहिवासी आहे. पुण्यातील बाणेर सुस भागात मागील तीन वर्षापासून तो राहत आहे. अमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ अमली पदार्थ तस्करी करणारे गुन्हेगार यांची माहिती काढून कारवाई करत होते. त्यावेळी पोलिसांना चतुर्शिंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर येथील युक्तिका सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक परदेशी नागरिक हा त्याच्या ओळखीच्या लोकांना कोकेन अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून 43 वर्षीय परदेशी नागरिकास ताब्यात घेतली. त्याच्या झडती दरम्यान त्याच्याकडे कोकेन हा अमली पदार्थ मिळून आल्याने त्याच्याविरोधात चतुर्शिंगी पोलिस ठाण्यात एनडीपीएस एकनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिस अमलदार सचिन माळवे यांनी चतुर्शिंगी पोलिस ठाणे येथे आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.  

COMMENTS