Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळा कारभार !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते बि.एस.एन.एल कार्यालय पर्यंतचे अर्धवट सिमेंट रोडचे राहिलेले काम कधी पुर्ण होनार ?

सिरसाळा प्रतिनिधी - सिरसाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पासून ते बी.एस.एन.एल  कार्यालय पर्यंतचा रोड उकरून ठेवला आहे तसेच हे रोड डॉ.बाबासाहेब आ

पाटोदा नगर पंचायत सदस्य अपात्रता प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांना चार आठवड्यांची मुदत; उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
मानवतेला काळीमा फासणारी घटना, आजच्या निषेध निदर्शनामध्ये सहभागी व्हावे- निखिल लातूरकर
कंत्राटी पद्धतीने शाळा : मुंबई महापालिकेचा शिक्षण व्यवस्थेत अजब प्रकार!

सिरसाळा प्रतिनिधी – सिरसाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पासून ते बी.एस.एन.एल  कार्यालय पर्यंतचा रोड उकरून ठेवला आहे तसेच हे रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पासून सदरील रोड ईदगाह चौक पर्यंत अर्धवट काम करून सोडून दिल्याचे  दिसत आहे.ह्या अर्धवट रोडच्या कामामुळे नागरीकांना वाहन चालकाना नाहक त्रास सहन करत वाट शोधावी लागत आहे. परंतू ह्या सर्व बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे तसेच झालेल्या अर्धवट कामामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही व एखादा अपघात घडल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरीकातून उपस्थित केला जात आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते बी.एस.एन.एल कार्यालय पर्यंत चे प्रलंबित राहीलेले काम सार्वजनिक बांधकाम विभाग कधी पुर्ण कराणार? किंवा एखादा अपघात झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभाग जाग येनार का ? अस नागरीकातून बोलले जात जात आहे.

COMMENTS