Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात 47 मिमी पावसाची नोंद; ओढे, नाल्यांना पूर

नांदेड प्रतिनिधी - मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देखील मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा धडाका सुरूच आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात देखील अश

तुळजाभवानी मंदिरातील 200 किलो सोनं वितळवण्यास परवानगी
जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
गौतमी पाटीलला सोलापुरात कार्यक्रमासाठी नो एंट्री

नांदेड प्रतिनिधी – मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देखील मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा धडाका सुरूच आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती असून, जिल्ह्यात मागच्या पाच दिवसांपासून दररोज पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. तर या पाच दिवसांच्या काळात 47.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे.
मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम विशेष म्हणजे मे महिन्यात उन्हाळी हंगामातील पिके काढणीला येऊन शेतकरी खरीपाच्या तयारीला लागतो. मात्र यावर्षी हवामानात मोठा बदल झाला असून, मे महिन्यात देखील दररोज पाऊस सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात मागील पाच दिवसांत एकही दिवस पावसाचा खंड पडलेला नाही. अनेक भागात शेत जमिनीत पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे पिके काढणीला देखील अडचणी येत आहेत.  मागील पाच दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यात (छरपवशव णपीशरेपरश्र ठरळप) सरासरी 47.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतीचे अतोनात (उीेि ङेीी र्वीश ीें ठरळप) नुकसान झाले आहे. दरम्यान शुक्रवारी पुन्हा पहाटे हिमायतनगर तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पावसाने तालुक्यातील ओढे, नाल्यांना पूर आला. उन्हाळ्यातही नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नांदेड शहर आणि परिसरातही गुरुवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीने (णपीशरीेपरश्र ठरळप) अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे पिकांचा अक्षरक्ष: चिखल झाला आहे. शेती पिकांसह जमिनीची माती देखील वाहून गेली. दरम्यान यातून स्वतःला सावरत बळीराजा पुन्हा उभा राहिला आणि  रब्बीतून काहीतरी हातात येईल म्हणून पुन्हा पेरणी केली. मात्र अवकाळी पावसाने त्या स्वप्नांवर देखील पाणी फिरवलं. मार्च, एप्रिलच नव्हे तर मे महिन्यात देखील सतत पाऊस सुरूच आहे. त्यामुळे रब्बी पिकांचं देखील आता नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना हतबल केलं आहे.

COMMENTS