Homeताज्या बातम्यादेश

बेळगावात फडणवीसांना दाखवले काळे झेंडे

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि पोलिसांमध्ये झटापट

बेळगाव/वृत्तसंस्था ः कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून, या भागात मराठी भाषिक लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे उपमु

राज्यात भाजपने मारली बाजी… मात्र, महाविकास आघाडी मिळून जिंकले जास्त उमेदवार
फडणवीसांची ती ऑफर…रस्त्यातील नमस्कारासारखी…
उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार-मलिक (Video)

बेळगाव/वृत्तसंस्था ः कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून, या भागात मराठी भाषिक लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी बेळगाव भागामध्ये भाजपचा प्रचार करत असतांना, महाराष्ट्र एकीकरण समितीने फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले.
बेळगाव भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार उभे केले आहे. शिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला आल्याच्या रागातून समितीने फडणवीस यांना बेळगावतील टिळक चौकात काळे झेंडे दाखविले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये अशी घोषणा करीत फडणवीसांच्या विरोधात कार्यकर्ते यांनी घोषणा दिल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्व मतदारसंघात एकच उमेदवार दिल्यामुळे मराठी भाषिक कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच समितीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. तरीही उपमुख्यमंत्रीफडणवीस हे बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगाव दाखल झाले. फडणवीस येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने टिळक चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना सभेपर्यंत जाऊ दिले नाही. तसेच अनेक कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून माघारी पाठविण्यात आले. तर अनेक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

संजय राऊत काँग्रेसचे दलाल ः फडणवीसांची टीका – काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मते कमी करण्यासाठी, काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत याठिकाणी आले आहेत, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी येथे येणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. उपमुख्यमंत्री फडणवीस बेळगाव दौर्‍यावर आहेत. तर यापूर्वी खासदार संजय राऊतही बेळगाव दौर्‍यावर होते. याठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर भाजपविरोधात बेळगावात येऊन प्रचार केल्याचा आरोप केला आहे. तसेच हे सर्व राऊतांनी काँग्रेसच्या सांगण्यावर केले असेही फडणवीस म्हणाले.

बजरंग दलावर बंदी घालायची कुणाच्या बापाची हिंमत ? – कर्नाटकमध्ये सत्ता आल्यास बजरंग दल आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालू असे आश्‍वासन काँग्रेसने या जाहीरनाद्वारे दिले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे नेते आता मुख्यमंत्री झाल्यासारखे वागायला लागले आहेत. प्रत्येकाला वाटते की आपण मुख्यमंत्री आहोत. काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध समाजाचा अपमान केला जातो. आता तर यांची मजल इथपर्यंत पोहोचली की ते आता बजरंग दलावर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. मात्र, बजरंग दलावर बंदी घालायची कोणाच्या बापाची हिंमत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

COMMENTS