Homeताज्या बातम्यादेश

कुरूक्षेत्रात स्थापणार जगातील सर्वात मोठी गीता

चंदीगड : हरियाणामधील पौराणिक कुरूक्षेत्र शहराच्या ज्योतीसर येथे जगातील सर्वात मोठी गीता स्थापन करण्यात येणार आहे. इटलीच्या मिलान शहरात हा ग्रंथ त

दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर
कन्हैया दूध उद्योग समूहाकडून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
राज्यात उष्माघाताचे चार बळी

चंदीगड : हरियाणामधील पौराणिक कुरूक्षेत्र शहराच्या ज्योतीसर येथे जगातील सर्वात मोठी गीता स्थापन करण्यात येणार आहे. इटलीच्या मिलान शहरात हा ग्रंथ तयार करण्यात आला असून युपो सिंथेटिक पेपर पासून बनलेल्या या ग्रंथाचे वज 1000 किलोग्राम आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जगातील पहिल्या रथासारख्या मंदिरात हा ग्रंथ ठेवण्यात येणार आहे. या ग्रंथाची सुमारे 700 पाने यंत्राद्वारेच उलटावी लागणार आहेत. श्रीकृष्ण-अर्जुन यांची एकाचवेळी पूजा होणारे हे पहिलेच मंदिर असेल. या मंदिराचे बांधकाम इस्कॉनकडून केले जात आहे. भगवान श्रीकृष्णांनी 5 हजार 160 वर्षांपूर्वी ज्याठिकाणी कर्मयोगाचा अमर संदेश दिला होता. त्याठिकाणी होत असलेल्या श्रीकृष्ण-अर्जुन मंदिरात गीता ठेवली जाईल. या मंदिरात अत्याधुनिक गीता संग्रहालयही उभारले जात आहे.  

COMMENTS