बलग्रेड/वृत्तसंस्था : सर्बियातील एका शाळेमध्ये 14 वर्षीय मुलाने केलेल्या गोळीबारात तब्बल 8 विद्यार्थ्याचा आणि सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाल्याची
बलग्रेड/वृत्तसंस्था : सर्बियातील एका शाळेमध्ये 14 वर्षीय मुलाने केलेल्या गोळीबारात तब्बल 8 विद्यार्थ्याचा आणि सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्बियातील बेलग्रेडमध्ये हा भीषण प्रकार घडला आहे.
या भीषण घटनेत इतर सहा मुले आणि एक शिक्षक गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्बियाच्या अतंर्गत व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले की, 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याने आपल्या शाळेत हा गोळीबार केला. या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. व्लादिस्लाव रिब्निकर इलेमेंट्री स्कूलमध्ये बुधवारी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी ही गोळीबाराची घटना घडली. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमधील व्रॅकर भागात ही घटना घडली.
COMMENTS