Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरूर येथे बापलेकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू,

पुणे प्रतिनिधी - शेततळ्यात पडलेल्या दीड वर्षांच्या मुलाला वाचविण्यासाठी पित्यानेही त्यात उडी टाकली. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने या बापलेक

राजूशेठ देशपांडे यांना टाटा उद्योग विकास पुरस्कार
उर्दू शाळेत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीत अपहार; उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीचा आरोप
सयाजीराव गायकवाड हे युगद्रष्टे महाराजा – बाबा भांड

पुणे प्रतिनिधी – शेततळ्यात पडलेल्या दीड वर्षांच्या मुलाला वाचविण्यासाठी पित्यानेही त्यात उडी टाकली. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने या बापलेकाचा बुडून मृत्यू झाला. बुडणाऱ्या पती व मुलाला वाचविण्यासाठी टाहो फोडत शेततळ्यात उडी घेतलेल्या महिलेच्या आवाजाने आसपासचे लोक मदतीला धावले. त्यामुळे महिलेचा जीव वाचला. जांबूत जवळील पंचतळे परिसरात साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. सत्यवान शिवाजी गाजरे (वय २५) व राजवंश सत्यवान गाजरे (वय दीड वर्षे) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे असून, स्नेहल सत्यवान गाजरे यांना स्थानिक तरुणांनी तातडीने तळ्यातून बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. मृत व जखमींना बाहेर काढून आळेफाटा (ता. जुन्नर) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ऋषिकेश दिगंबर झिंजाड यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत सत्यवान गाजरे यांच्या वडिलांच्या नावे जांबूतजवळ पंचतळे येथे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र व गार्डन मंगल कार्यालय असून, मागील बाजूस जवळपास वीस फूट खोल शेततळे आहे. काल सायंकाळी चारच्या सुमारास सत्यवान पत्नी स्नेहल व मुलगा राजवंश याच्यासह या कृषी पर्यटन केंद्रात आले होते. यावेळी फेरफटका मारत असताना राजवंश नजर चुकवून खेळता खेळता शेततळ्यात पडला. ते पाहून सत्यवान यांनी त्याला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने ते देखील बुडू लागले. त्यावेळी शेततळ्याकडे धाव घेतलेल्या स्नेहल यांनी मदतीसाठी आरडाओरडा करीत पती व मुलाला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. दरम्यान, त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने हॉटेलवर असलेले सत्यवान यांचे बंधू किरण गाजरे, प्रवीण गाजरे व हॉटेलमधील कामगारांनी तळ्याकडे धाव घेतली. इतर स्थानिक तरूणांच्या मदतीने तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले. तेव्हा तिघेही बेशुद्धावस्थेत होते. त्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर सत्यवान व राजवंश यांना मृत घोषित केले.

COMMENTS