शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी - शहरातील शिवनेरी महाविद्यालयातील प्रांगणात उभारण्यात येत असलेल्या सहकारमहर्षी कै.अॅड. विश्वंभर माने पाटील यांच्या पूर्ण
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी – शहरातील शिवनेरी महाविद्यालयातील प्रांगणात उभारण्यात येत असलेल्या सहकारमहर्षी कै.अॅड. विश्वंभर माने पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा दि. 6 मे रोजी माजी युवक कल्याण, क्रिडा, पुनर्वसनमंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवनेरी महाविद्यालयाचे सचिव पदमाकर मोगरगे,उपाध्यक्ष अॅड सुतेज माने, जिल्हा बॅकेचे संचालक जयेश माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
तालुक्यातील लक्कड जवळगा येथील भुमीपुत्र कै. अॅड. विंश्वभरराव माने यांनी आपल्या कारकर्दिीत सहकार, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांची कायम आठवण राहावी,त्यांच्या रोखठोक बोलण्याचा स्वभाव व त्यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब शेतमजूर यांच्या पाल्यांना एक शैक्षणिक दालन उभे करून दिले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्यासाठी संस्थेच्या वतीने संस्थेच्या प्रांगणात सहकारमहर्षी कै. अॅड विश्विभरराव माने पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.या स्मारकाचे अनावरण माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार अमित देशमुख, माजी कामगार मंत्री आमदार संभाजीराव पाटील निंलगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार धिरज देशमुख, माजी राज्य मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार अभिमन्यू पवार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नायगावचे आमदार राजेश पवार, आमदार विक्रम काळे, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ सोहळा दि. 6 मे रोजी सायंकाळी 5 वाजता शिवनेरी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. सहकार महर्षी कै.अॅड.विश्विभरराव माने पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्था सचिव पदमाकर मोगरगे संस्थाध्यक्ष प्रतापराव माने, संस्था कोषाध्यक्ष जयेश माने,उपाध्यक्ष अॅड सुतेज माने यांनी केले आहे.
COMMENTS