Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक कामगार दिनानिमित्त ऊसतोड कामगारांचा सन्मान-बबनराव माने

बीड प्रतिनिधी - जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने यांनी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त ऊस

बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळली; ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
डंपरच्या धडकेत गरोदर महिलेचा पोट फुटून अर्भक रस्त्यावर.
कोपरगावच्या भाजयुमोचे तालुकाध्यक्ष गवळी तर शहराध्यक्षपदी साठे

बीड प्रतिनिधी – जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने यांनी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप केले तसेच प्रगतशील ऊसतोड कामगारांच्या पाल्याचे ही स्वागत सत्कार करण्यात आले याप्रसंगी जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय महाराष्ट्र ऊसतोड संघटना मागील काही वर्षांपासून उसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये सक्रिय आहे . नुकतेच भाळवणी येथे जिल्हाधिकारी बीड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ओळखपत्राचे वाटप झाले व लोकनेते गोपीनाथराव मुंडे कामगार मंडळाच्या माध्यमातून सरकारी सुविधा मिळवण्यासाठी सरकार दरबारी नोंदणी महत्त्वाचे असते हे पटवून दिले त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून विविध ठिकाणी मेळावे आयोजित करून ऊसतोड कामगार संदर्भात जनजागृती करण्यात आली. आज महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त बेलेश्वर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या प्रसंगी ऊसतोड कामगारांना ओळपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले . अण्णासाहेब खिल्लारे, राजाभाऊ कोळपे, हुंकार झांजुर्णे, वसंत शेळके, महादेव वायभट , विमल भोसले या कामगारांचा सत्कार करण्यात .तसेच या ऊसतोड कामगारांनी आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी परिस्थिती उपलब्ध करून दिली व पुढील पिढीतील हातातील कोयता सुटला अशा कुटुंबाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे गोरगरिबांना वंचित उपेक्षितांना न्याय देण्याचा वारसा आज जय महाराष्ट्र कामगार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने हे चालवत आहेत . आज ऊसतोड कामगारांचे शैक्षणिक प्रश्न, आरोग्याच्या प्रश्न , विमा , स्थलांतरांचे प्रश्न तथा राशन या संदर्भातील शासन दरबारी कागदपत्रे स्थलांतरित करून हा सर्व लाभ त्यांना कारखान्याच्या ठिकाणी मिळावा यासाठी वेळोवेळी शासनाबरोबर संघर्ष करण्यात आला . यामध्ये जय महाराष्ट्र उत्सव कामगार संघटना कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत आहे . ग्रामीण भागामध्ये ही संघटना लोकप्रिय होत असून अनेक लोक या संघटनेला जोडले जात आहेत . भविष्यातील कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे व त्यांना मदत करण्याचे आश्वासन जय महाराष्ट्र कामगार संघटनेचे बबनराव माने यांनी दिले . याप्रसंगी उपस्थित अण्णासाहेब खिल्लारे, राजाभाऊ कोळपे, हुंकार झांजुर्णे, वसंत शेळके, महादेव वायभट , विमल भोसले या कामगारांचा सत्कार करण्यात आला .

COMMENTS