पुण्यातच कोव्हिशिल्ड संपले; शहरातली सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवायची वेळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातच कोव्हिशिल्ड संपले; शहरातली सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवायची वेळ

पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहेत. काही केंद्रावर जिथे कोव्हॅक्सिनचा साठा आहे ती केंद्र वगळता इतर कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नाहीये.

दैनिक लोकमंथन l देशमुख यांच्या चौकशीसाठी सीबीआय टीम दाखल
’आरे’ तील आदिवासींचा संसार पुन्हा उभा करणार; तनपुरे
भीषण अपघात… 22 जण गाडीच्या टपावरुन कोसळले | LOKNews24

पुणे : पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहेत. काही केंद्रावर जिथे कोव्हॅक्सिनचा साठा आहे ती केंद्र वगळता इतर कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नाहीये. पुणे शहरासाठी काही दिवसांपूर्वी कोव्हीशिल्डच्या ३५००० लसी आल्या होत्या. 

    मात्र या लसी संपल्या तरी राज्याकडुन नवीन साठा आलेला नाहीये. यामुळे ही केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. आज संपुर्ण दिवस लसीकरण बंद राहणार असुन आजही राज्य सरकारकडुन नवीन साठा येण्याबाबत काहीही माहिती पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे साठा आला तरच उद्या लसीकरण सुरु होवु शकेल अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान कोव्हीशिल्ड संपलेलं असले तरी काही केंद्रावर कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध आहे. ती केंद्र सुरु रहातील असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

COMMENTS