पुणे  शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत आला आहे.

Nanded : गर्भवती महिलेस महिला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण (Video)
बहुजन समाज पार्टीच्यावतीने इफ्तार पार्टी
गेवराई येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत आला आहे. संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे. त्यामुळे काही खासगी हॉस्पिटलने ऑक्सिजनवरील रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यास सुरुवात केली आहे. 

    खासगी रुग्णालयात सुमारे दीड ते दोन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील 135 खासगी रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 9 हजार खाटा रुग्णांसाठी आरक्षित आहेत. सद्यस्थितीत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनाच्या वाढत्या तक्रारींमुळे अधिकाधिक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. परंतु, ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे आणि मागणीत वाढ झाल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. महापालिका हॉस्पिटलमध्ये दिवसाला लिक्विड ऑक्सिजन साधारणतः 50 मेट्रिक टन आणि 30 मेट्रिक टन खासगी हॉस्पिटलला लागतो. अडीच हजार ऑक्सिजनचे जम्बो आणि 15 ते 20 डीवरा सिलेंडर संपूर्ण शहरासाठी लागतात. मात्र, ऑक्सीजनची मागणी आणि पुरवठा यात अंतर पडत आहे. त्यामुळे ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे.

COMMENTS