Homeताज्या बातम्याक्रीडा

बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागने रचला इतिहास

सध्या भारतात आयपीएल 2023 ची धामधूम सुरु असताना दुसरीकडे भारताने बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बँडमिंटन

डेव्हिड वॉर्नरची कसोटी-वनडेमधून निवृत्तीची घोषणा
पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून कराडकरांसह लोकप्रतिनिधींची दिशाभूल
निसर्ग गार्डन कात्रजची बैलगाडी ठरली बाबाराजे जावळी केसरीची मानकरी

सध्या भारतात आयपीएल 2023 ची धामधूम सुरु असताना दुसरीकडे भारताने बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बँडमिंटनमधील स्टार जोडी सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. रविवारी दुबईत पारपडलेल्या स्पर्धेत या स्टार जोडीने भारताला तब्बल 58 वर्षांनंतर आशिया चॅम्पियन बनवले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामना हा  मलेशियाच्या ओंग येव सिन आणि तेओ यी यी यांच्यासोबत झाला होता. सुरुवातीला सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर सात्विक आणि चिरागने जोरदार पुनरागमन करून मलेशियाच्या स्पर्धक जोडीला 21-16, 17-21, 19-21 अशा फरकाने पराभूत केले. सात्विक आणि चिराग यांनी बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेपूर्वी  जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. तसेच बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये यापूर्वी दिनेश खन्ना याने भारताकडून पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला होता. दिनेशने 1965 मध्ये लखनौ येथे पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या सांगोब रत्नुसोर्नचा पराभव करून ही कामगिरी केली होती.

COMMENTS