Homeताज्या बातम्यादेश

प्रियंका गांधी यांनी घेतली महिला कुस्तीगिरांची भेट

नवी दिल्ली प्रतिनिधी - भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची शुक्रवारी

राज्यात उद्यापासून ई-पासची गरज नाही
शाहरुख खानचा जवानाची 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
अबू आझमी ‘प्राप्तिकर’च्या रडारवर

नवी दिल्ली प्रतिनिधी – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी दखल घेतली. त्यांच्याविरोधात ‘पोक्सो’सह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांनी समाधान व्यक्त केलं. मात्र, अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अशातच आज ( २९ एप्रिल ) सकाळीच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या जंतरमंतर येथील आंदोलनस्थळी पोहचल्या. प्रियंका गांधींनी विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्याबरोबर चर्चा करत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रियंका गांधींबरोबर काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डाही आंदोलनस्थळी उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा कुस्तीगिरांची भेट घेणार आहेत. दरम्यान, लैंगिक शोषणाबाबतच्या महिला कुस्तीगिरांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करून ब्रिजभूषण यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आघाडीचे कुस्तीगीर २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे पुन्हा आंदोलन करत आहेत. त्यांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर दिल्ली पोलिसांना शुक्रवारी ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला.

COMMENTS