Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री सदस्य मृत्यूप्रकरणी तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार

मुंबई : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार उष्माघाताच्या त्रासामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरत संबंधितांवर फौजदारी कारव

ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन
श्रीगोंदा शहरात दुकाने फोडण्याची मालिका सुरूच
अखेर आरणगाव ग्रामपंचायती विरोधात चौकशी समिती नेमली  

मुंबई : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार उष्माघाताच्या त्रासामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरत संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणार्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. आता या याचिकेवर 8 जूनला सुनावणी होणार आहे.
विरारच्या सामाजिक कार्यकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत उपरोक्त जनहित याचिका दाखल केली आहे. यात याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात तीव्र उष्णतेचा त्रास झाल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. याचिकेत पुढे म्हटले आहे की, राजकीय फायद्यासाठीच कडक उन्हात इतका भव्य कार्यक्रम करण्यात आला. तसेच कार्यक्रमावर झालेला खर्च आयोजकांकडून वसूल करण्यात यावा.

COMMENTS