Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीमानव मुक्तीचा लढा उभा केला!

विविध ठिकाणच्या जयंतीत पप्पू कागदे यांचे प्रतिपादन

बीड प्रतिनिधी - माणूस आणि माणसाचे जगातील हे नाते समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मानवतावादी मूल्यावर निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला
मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची पोलिसांनी काढली वरात
प्रधानमंत्री जन-धन योजनेत 46 कोटींपेक्षा अधिक लाभधारक

बीड प्रतिनिधी – माणूस आणि माणसाचे जगातील हे नाते समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मानवतावादी मूल्यावर निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात सर्वप्रथम मानव मुक्तीचा लढा उभा केला. असे प्रतिपादन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा  बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील घाटसावळी, रांजणी, जुजगव्हाण, आडगाव, केसापुरी परभणी, मौज, ताडसोन्ना, मांजरसुंबा या ठिकाणी आयोजित केलेल्या जयंतीत पप्पू कागदे बोलत होते.
 पुढे बोलताना पप्पू कागदे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या इतिहासातील पहिला मानव मुक्तीचा लढा महाडचा सत्याग्रह 1927 साली केला, चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समता, स्वातंत्र्य,न्याय, बंधुता यावर आधारित न्यायप्रणाली उभी करून वंचित, शोषित, पीडित समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. असे मत पप्पू कागदे यांनी व्यक्त केले.
 यावेळी राजू जोगदंड, किसन तांगडे, किशोर कांडेकर, मायाताई मिसळे, सुभाष तांगडे,  प्रा. आनंद मोरे, प्रा. गोपाळ धांडे, मुरली गंगावणे, रवी गंगावणे, विनोद तांगडे, सतीश शिंगारे, रामभाऊ वक्ते, समाधान वक्ते, नागेश शिंदे, राहुल कांबळे, नितीन वाघमारे, आप्पा मिसळे, अनंत विद्यागर, बाळू निसर्गंध, राहुल घोडेराव, विठ्ठल घोडेराव, पप्पू वाघमारे सुशील तांगडे अमोल डावकर, कचरू डावकर, सोमनाथ  माने, अमित सवाई, बंडू मिसळे, विशाल इंगोले,संदीप इंगोले आदींची उपस्थिती होती.

COMMENTS