पुणे - पुण्याच्या सावित्रीबाई विद्यापीठात रॅप साँग शूट केल्या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने आज जोरदार आंदोलन करत राडा केला. या आंदोलना
पुणे – पुण्याच्या सावित्रीबाई विद्यापीठात रॅप साँग शूट केल्या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने आज जोरदार आंदोलन करत राडा केला. या आंदोलनात कर्यकर्त्यानी निर्दशने केली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत हा सर्व प्रकार घडला. त्यावेळी विद्यापीठ प्रशासन आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांची बैठक सुरु होती. कार्यकर्त्यांनी या आंदोलनात विद्यापीठात तोडफोड देखील केली आहे. या आंदोलनात विद्यापीठाच्या काचा फोडल्या आणि काही वस्तूंचे नुकसान केले.या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे. रॅपसॉंग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध! एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार?’,प्रकरण काय आहे जाणून घ्या काही दिवसांपूर्वी शुभम जाधव नावाच्या एका मुलाने सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात एक रॅप साँग शूट केलं ओट यावरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या रकरणात शुभम वर पोलीस होण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठातर्फे उच्चस्तरीय समिती स्थापिली होती. या बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते..
COMMENTS