Homeताज्या बातम्यादेश

भारतातील जलाशयविषयक पहिलीच गणना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली देश

गर्दी टाळा, ऑनलाईन दर्शनालाच प्राधान्य द्या : डॉ. रविंद्र शिसवे
राज्यात सोमवारी सुटी जाहीर
फसवणूक प्रकरणी तिघे गजाआड

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जलशक्ती मंत्रालयाने भारतात  जलाशय विषयक पहिली गणना केली आहे. भारतातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित तळी, तलाव आणि इतर जलस्रोतांचा समावेश असलेली जलसंसाधने  आणि जलस्रोतांच्या अतिक्रमणाबाबतची माहिती या गणनेत संग्रहित करण्यात आली आहे. या गणनेत ग्रामीण आणि शहरी भागातील असमतोल आणि अतिक्रमणाचे  विविध स्तर अधोरेखित करत देशाच्या जलस्रोतांबाबत महत्त्वपूर्ण माहिती सादर केली आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील वापरात असलेल्या तसंच वापरात नसलेल्या सर्व जलस्रोतांचा यात समावेश आहे. जलसिंचन, उद्योग, मत्स्यपालन, घरगुती-पिण्याचे पाणी, मनोरंजनात्मक वापर, धार्मिक, भूजल पुनर्भरण या जलस्रोतांच्या  सर्व प्रकारच्या वापराचाही या गणनेत विचार करण्यात आला आहे. ही गणना यशस्वीरित्या पूर्ण झाली असून अखिल भारतीय आणि राज्यनिहाय  अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत.

COMMENTS