Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खर्डा येथे भव्य ईद मिलन कार्यक्रम उत्साहात

जामखेड/प्रतिनिधी ः खर्डा शहर हे हिंदु-मुस्लिम एकतेचे कायम प्रतीक राहिले असून शहरामध्ये हिंदु-मुस्लिम धर्मियांचे नागरीक गुण्यागोविंदाने राहतात. आप

डिपीचे उद्घाटन करणारा राज्यातील पहिला मंत्री राज्याला लाभला
आरती केदार हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
पिकविमा भरपाई मिळण्यासाठी मतदारसंघात पाहणी सुरु ः आ.काळे

जामखेड/प्रतिनिधी ः खर्डा शहर हे हिंदु-मुस्लिम एकतेचे कायम प्रतीक राहिले असून शहरामध्ये हिंदु-मुस्लिम धर्मियांचे नागरीक गुण्यागोविंदाने राहतात. आपल्या पूर्वजांनी जपलेला बंधुभावाचा वारसा पुढे चालू ठेवत खर्डा शहर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील सर्वच मुस्लिम बांधवांनी सामूहिक स्वरुपात खर्डा शहर आणि पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी भव्य असे शीर खुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
ईदनिमित्त शहरातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या नागरिकांनी एकत्र येऊन आपसात हितगुज साधावे तसेच सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपला जावा तसेच ईद निमित्ताने समाजातील संबंध गोड करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला. यावेळी खर्डा शहर आणि परिसरातील, नागरिकांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैदयकिय, शासकीय अधिकारी,व्यापारी, पोलीस प्रशासन आदी क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला व या सुंदर उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी खडकपुरा मस्जिद कमीटी, अल कुरैश ग्रुप, हजरत टिपू सुलतान युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS