मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एकाचित्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एकाचित्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘उदय’ असं या चित्त्याचं नाव असून, त्याचे वय सहा वर्ष होते. मागील दोन महिन्यात कुनो नॅशनल पार्कमध्ये दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी कुनो पार्कमध्ये मादी चित्ता साशा हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता उदय या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (23 एप्रिल) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चित्ता उदय मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसून आला. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली. त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे दिसून आले. उदयला उपचारासाठी ट्रॅकुलाइज केलं. त्यानंतर बेशुद्ध करुन त्याच्यावर उपचार सुरु केले होते. मात्र, उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपाचर आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वार्डात ठेवलं होतं. मात्र रविवारी चार वाजण्याच्या सुमारास उदयचा मृत्यू झाला.
COMMENTS