किनवट प्रतिनिधी - शहरातील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये जयंती सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा बसवेश्वरा
किनवट प्रतिनिधी – शहरातील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये जयंती सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चा करण्यात आली. दरम्यान किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती सोहळा मोठ्या भक्ती भावाने उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते राघू मामा, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, प्राचार्य शिंदे सर, भाजपाचे माजी शहराध्यक्ष युवा नेते सतिश बिराजदार, मराठी पत्रकार परिषदेचे मा. अध्यक्ष अनिल भंडारे, संजय बिराजदार, चंद्रकांत भंडारे, प्रल्हाद भंडारे, विश्वनाथ भंडारे, राजेंद्र वड्डे, चंद्रशेखर व्यवहारे, अरुण भंडारे, विजय भंडारे, विजय महाजन, योगेश बिराजदार, मारुती गाढवे, किशन राकोंडे, राजाराम राईकवाडे, संतोष ठोंबरे, बबन राकोंडे, संजय भालके, नागनाथ भंडारे, सदर जयंती सोहळ्यास इत्यादी समाज बांधवांची उपस्थिती होती.
COMMENTS