लोणंद / प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुकची सुकन्या असलेली आसावरी अशोक रासकर या विद्यार्थीनीने दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेतून
लोणंद / प्रतिनिधी : खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुकची सुकन्या असलेली आसावरी अशोक रासकर या विद्यार्थीनीने दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेतून घवघवीत यश मिळविल्या बद्दल तसेच श्रीलंका या देशात होणार्या इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खेड बुद्रुक येथील महात्मा जोतीराव फुले प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित करण्यात आले. यावेळी महात्मा जोतीराव फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश जगन्नाथ रासकर, सदस्य रमेश सर्जेराव रासकर, सदस्य दतात्रय रासकर, उपाध्यक्ष सुनिल रासकर, सचिव भानुदास रासकर, खेड बुद्रुक गावचे सरपंच गणेश धायगुडे पाटील, उपसरपंच धनश्री संदीप रासकर, नारायण दादासो धायगुडे, ग्रामपंचायत सदस्या उमाताई रासकर, यात्रा कमिटी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
आसावरी रासकर हिने भालाफेकमध्ये गोल्ड मेडल आणि थाळी फेक मध्ये सिल्व्हर मेडल मिळविलेले आहे. स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन दिल्ली यांच्या वतीने 19 व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक नॅशनल गेम्सचे आयोजन दिल्लीत करण्यात आले होते.यावेळी धावणे, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक,भाला फेक या सारख्या विविध मैदानी स्पर्धा झाल्या.
आसावरी रासकर हिने भालाफेक आणि थाळी फेक मध्ये चांगली कामगिरी करत यशाला गवसणी घातली आहे. तिचे हे यश महत्वपूर्ण आणि मोलाचे समजले जात असून खेड बुद्रुकमध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. खेड करांना या यशाबद्दल आनंद झाला असून या यशाची दखल घेत महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन तिचा सन्मान ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आसावरी रासकर लोणंदच्या शाळेत शिकत असून आसावरीला स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशनच्या सातारा जिल्ह्याच्या सेक्रेटरी शुभांगी धसाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. शुभांगी धसाडे यांनी आसावरी कडून प्रत्यक्ष मैदानातून चांगला सराव करून घेण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या यशात शुभांगी धसाडे यांचा मोलाचा वाटा असल्याने या यशाबद्दल आसावरी हिने शुभांगी धसाडे यांचे विशेष आभार मानलेले आहेत. हे सगळे तुमच्या मुळे माझ्या आयुष्यात घडत आहे. या सगळ्यासाठी धन्यवाद. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहो हीच अपेक्षा आसावरी ने शुभांगी धसाडे यांच्या कडून बाळगलेली आहे.
COMMENTS