Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 राजकारणी आणि उद्योगपतींची मैत्री असण्यात गैर काय? – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर प्रतिनिधी - राजकारणी आणि उद्योगपतींची मैत्री असण्यात गैर काय आहे? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी येथे माध्यमांशी बोलताना

प्रवाशांनी भरलेली बस पलटली I LOKNews24
दुचाकी विहिरीत पडून एकाचा मृत्यू
राज्यात बिलावल भुट्टोंविरोधात भाजप आक्रमक

नागपूर प्रतिनिधी – राजकारणी आणि उद्योगपतींची मैत्री असण्यात गैर काय आहे? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. सध्या चर्चेत असलेले उद्योगपती गौतम अदानी यांनी गुरूवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या संदर्भात प्रश्न विचारला असता बावनकुळे यांनी उपरोक्त सवाल केला. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळे ते कधीही एकमेकांची भेट घेऊ शकतात. हे लक्षात घेता अदानी आणि पवार भेटीचा वेगळा अर्थ लावणे योग्य होणार नाही. हिंडेनबर्ग अहवालावरून काँग्रेसने अदानीविरूद्ध रान उठवले आहे. पण, विदेशातील एखाद्या संस्था वा यंत्रणेवर आपण किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. शरद पवार यांनीही या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे, असे बावनकुळे म्हणाले. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तरे देण्यासाठी मी प्रवक्ते नेमले आहे. तेव्हा राऊतांनी केलेल्या वक्तव्यांबाबत प्रवक्त्यांना विचारा असे ते म्हणाले. उबाठा शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी खारपाणट्ट्यातील पाणी प्रश्नावरून पाणी यात्रा काढली. लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलन करणे गैर नाही. पण ते कोणाच्या घरासमोर करणे चुकीचे आहे. देशमुख यांनी मांडलेला पाणी प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे आणि सरकार सोडवेलही. यापूर्वी आम्हीही अनेकानेक आंदोलने केली. आंदोलनाच्या शेवटी डिटेनच केले जाते. तसे त्यांनाही केले जाते.

COMMENTS