Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निफाड येथे शाळा पूर्वतयारी तालुकास्तर प्रशिक्षण संपन्न

निफाड प्रतिनिधी - निफाड पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने तालुक्यातील २० केंद्रातील २२४ जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांकरीता शाळा पूर्वत

शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत शासन शेतकऱ्यांच्या बाजूने : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मंत्रिमंडळात नव्या चेहर्‍यांना संधी ; भाजपच्या 20 शिवसेनेच्या 10 राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी घेतली शपथ
रूग्ण सेवकांची सोय झाल्यास अनेक ठिकाणी कोवीड सेंटर सुरू होतील- ऍड रविकाका बोरावके

निफाड प्रतिनिधी – निफाड पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने तालुक्यातील २० केंद्रातील २२४ जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांकरीता शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण निफाड इंग्लिश स्कूल निफाड येथे आयोजित करण्यात आले होते. सन २०२३/२४या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याआगोदर जुन मध्ये इयत्ता १ली च्या वर्गात दाखलपाञ बालक व त्याच्या पालकांसाठी विशेष जागृती व बालकांचा उत्साह वाढविण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते.या प्रशिक्षण करीता प्रत्येक केंद्रातून दोन शिक्षक यांना तज्ञ म्हणून प्रशिक्षण देण्यात आले यानंतर पुढील टप्पा केंद्र स्तरावर इयत्ता १ली ते ५वी चे शासकीय शाळेतील शिक्षक व अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका,मदतनीस यांचे प्रशिक्षण होईल व त्यानंतर शाळा स्तरावर ३०एप्रिल पुर्वी मेळावा आयोजित केला जाईल या मेळाव्याच्या माध्यमातून दाखलपाञ बालकाच्या शारीरिक,बौद्धिक,सामाजिक क्षमतांची चाचणी घेउन त्याला कशाची आवश्यकता आहे याची नोंद घेऊन आठ ते दहा आठवडे त्या बालकाला माता ,लिडरमाता, स्वयंसेवक,अंगणवाडी सेविका  सेविका शाळेचे शिक्षक यांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाईल व पुन्हा जुन मध्ये मेळावा घेतला जाईल त्यावेळी पुन्हा त्या बालकाची  अशीच चाचणी होईल व आनंददायी वातावरणात त्या बालकाचा शाळेत प्रवेश निश्चित होऊन त्याचा शिक्षणाचाश्रीगणेशा सुरू होईल…

या प्रशिक्षणास तालुक्यातील ४० शिक्षक गटसाधन केंद्र सर्व कर्मचारी,एलएफईचे शुभम सोनवणे, विस्तार अधिकारी कैलास बोरसे व गटशिक्षणाधिकारी प्रिती पवार उपस्थित होते. तज्ञ मार्गदर्शक म्हणून  विषयतज्ञ विजय खालकर व अंगणवाडी पर्यवेक्षिका विनया महाले यांनी कामकाज केले. या करीता निफाड इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री.अरुण महाजन व शाळेचे सहकार्य मिळाले…

COMMENTS