श्रीरामपूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव भागातील इंदिरानगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार स
श्रीरामपूर/प्रतिनिधी ः श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव भागातील इंदिरानगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार संगमनेर येथील प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे यांच्या ’माझी सिंधूमाय ’या चरित्र पुस्तकास मिळाला ही बाब इतरांना लेखन, वाचन, चिंतन, संशोधन आणि संवाद करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत ह.भ.प. खामकर महाराज यांनी व्यक्त केले.
संगमनेर येथील श्रीसंत गोरोबा काका यांच्या 706 व्या पुण्यतिथीचे संत गोरोबाकाका मंदिर आळा भागात आयोजन करण्यात आले होते.प्रथम ह.भ.प.खामकर महाराज पारनेरकर यांच्या शुभहस्ते काकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर खामकर महाराजांचे सुश्राव्य असे एक तासाचे प्रवचन झाले. महाराजांच्या हस्ते समाजबांधवांनी प्रा. दिलीप सोनवणे यांच्यामाझी सिंधूमायया चरित्र ग्ंथास श्रीसंत गोरा कुंभार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल गोरोबा काका मंदिर कुंभार आळा संगमनेर येथे कुंभार समाज बांधवांनी शाल,श्रीफळ हार व बुके देऊन यथोचित सत्कार केला.याप्रसंगी सुभाष जोर्वेकर,रमेश जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, भारत जोर्वेकर, दिलीप वाकचरे, राजेंद्र जोर्वेकर, अनिल जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, बाबूराव जोर्वेकर, प्रकाश जोर्वेकर व समाज बांधव व महिला भगिनी मुले मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रा.दिलीप सोनवणे यांनीमाझी सिंधूमाय पुस्तकाचे महत्व सांगून कुंभार समाज बांधवानी आपले अनुभव लेखन करावे अशी विनंती करून श्रीरामपूर येथील डॉ बाबुराव उपाध्ये हे नेहमीच साहित्य लेखनास प्रेरणा देतात त्यामुळे माझ्यासारखे अनेक हात लिहिते झाले असल्याचे सांगून सर्वांचेआभार मानले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS