जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड नगरपरिषदच्या वतीने दिव्यांगांना 5लाख 57 हजार रुपयांचा निधी नुकताच वाटप करण्यात आला असून, दिव्यांगाच्या प्रलंबित निधीसाठ

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड नगरपरिषदच्या वतीने दिव्यांगांना 5लाख 57 हजार रुपयांचा निधी नुकताच वाटप करण्यात आला असून, दिव्यांगाच्या प्रलंबित निधीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली 10 एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते.
जामखेड नगरपरिषद व तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगा बांधवाचा 5 टक्के निधी अनेक महिन्यांपासून वितरीत करण्यात आलेला नव्हता. सदर प्रशासनाने पुढील 7 दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार 17 एप्रिल रोजी मुख्याधिकारी अजय साळवे यांचे हस्ते नगरपरिषदेच्या दालनात चेकचे दिव्यांगाना वितरण करण्यात आले. यावेळी नय्युभाई सुभेदार यांनी प्रहाराच्या वतीने मुख्याधिकारी यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले व पुढील काळात असेच सहकार्य करण्याची मागणी केली. यावेळी तालुका संघटक भिमराव पाटील,दिव्यांग सेलचे तालुका उपाध्यक्ष संजय मोरे, प्रमोद कुलकर्णी, मच्छींद्र शेळके (टेलर), महिला तालुका प्रमुख विधाते, लिमकर टेलर, शहर उपाध्यक्ष दिनेश राळेभात, छाया औटी, सोहेल तांबोळी, सुनील नाटके, सचिन उगले, किरण क्षीरसागर, भोसले, करण समुद्र आदी तसेच नगरपरिषदचे विभागप्रमुख प्रमोद टेकाळे, नगरपरिषदचे कर्मचारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
COMMENTS