खा. विखेंना भोवणार अखेर ते इंजेक्शन?…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. विखेंना भोवणार अखेर ते इंजेक्शन?…

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी महतप्रयासाने रेमडीसीवीर इंजेक्शन आणल्याचा दावा करणारे नगर दक्षिणेचे भाजपचे खा. ड़ॉ. सुजय विखे यांना अखेर हेच इंजेक्शन भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या तालुकध्यक्षपदी शरद खरात
 गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस इंटरक्टिव पॅनल भेट
विरोधक खोटे आरोप करत असून आम्ही कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार;- भाजपाचे विरोधकांना आवाहन …

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी महतप्रयासाने रेमडीसीवीर इंजेक्शन आणल्याचा दावा करणारे नगर दक्षिणेचे भाजपचे खा. ड़ॉ. सुजय विखे यांना अखेर हेच इंजेक्शन भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहे. त्यांच्या या इंजेक्शन विषयाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. येत्या 29 रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. 

याबाबतची माहिती अशी की, नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडीेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणल्याचा दावा करून या साठ्याच्या वाटपाबद्दलची माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत (सोशल मिडिया) प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानामधून उतरविला. पण तो रेमडीेसिवीरचा साठा कोठून आणला, हे त्यांनी जाहीर केलेले नाही. या साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाला व राहाता येथील सरकारी दवाखान्याला देखील देखील वाटप केले. पण

10 हजार रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा कोणताही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ. विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्याबाजारातून खरेदी केला असावा, हा रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त व शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला, याचा हिशोब देखील कुठे नाही अशा विविध मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली आहे व या प्रकरणात खासदार डॉ. विखे यांच्यावर रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा कोणताही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

मंगळवारी (दि. 26) या याचिकेवर खंडपीठात सुनावणी झाली. हा रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा तात्काळ शासनाने जप्त करावा व अहमदनगर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत समन्याय पद्धतीने वाटप करावे, अशी मागणी याचिकाकर्त्याच्यावतीने यावेळी करण्यात आली. खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे व न्यायमूर्ती बी. यु. देबडवार यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला अशा परिस्थितीत जी कायदेशीर कार्यवाही करता अली असती, तशी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड अजिंक्य काळे व अ‍ॅड. राजेश मेवारा यांनी काम पाहात आहे तर शासनाच्यावतीने अ‍ॅड. डी. आर. काळे काम पाहात आहे.

ड़ॉ. विखेंची भूमिका उत्सुकतेची

खा. डॉ. विखेंनी रेमडीसीवीर इंजेक्शन्सबाबत सोशल मिडियातून व्हायरल केलेल्या व्हीडीओनंतर त्यांच्या रेमडीसीवीर वाटपाला राष्ट्रवादीनेही आक्षेप घेतला आहे व आता थेट खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे आता यावर त्यांची भूमिका उत्सुकतेची झाली आहे तसेच 29 रोजी याचिकेच्या खंडपीठात होणार्‍या सुनावणीत काय होते, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.

COMMENTS