Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री करीबसवेश्वर यात्रेत कुस्ती स्पर्धा उत्साहात

कासारसिरसी प्रतिनिधी - निलंगा तालुक्यातील कासार सिरसी येथे सुरू असलेल्या श्री करीबसवेश्वर यात्रा महोत्सवाची सांगता कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाने

बा विठ्ठला ! राज्यातील जनतेला सुखी ठेव
सोलापूर रेल्वे स्थानकावर ‘जन औषधी केंद्र’
शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

कासारसिरसी प्रतिनिधी – निलंगा तालुक्यातील कासार सिरसी येथे सुरू असलेल्या श्री करीबसवेश्वर यात्रा महोत्सवाची सांगता कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाने करण्यात आली. रामिंलग मुदगड येथील पैलवान सागर हरिश्चिद्र बिराजदार व दिल्लीचा पैलवान विक्रांत कुमार यांच्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती खेळविण्यात आली. या कुस्तीत रामिंलग मुदगड च्या सागर बिराजदार या पैलवानाने दिल्लीच्या विक्रांत कुमारला आस्मान दाखवत प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकली.
प्रथम क्रमांकाचे पारितोषक 51 हजार रुपये रोख व ढाल ठेवण्यात आले होते. तर द्वितीय कुस्ती 21 हजार रुपये व तसेच 21 तोळे चांदीचे कडे असे पारितोषक ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर 11 हजार रुपये 10, हजार, 7 हजार, 5 हजार रुपयांच्या पारितोषकांच्या अनेक कुस्त्या खेळविण्यात आल्या. पंच म्हणून अशोक होळकुंदे, बाबुराव लामजणे, पिराजी बुकले, बळीराम बिराजदार, गणेश जगदाळे आदींनी काम पाहिले. या कुस्तीच्या दंगलीमध्ये उत्कृष्ट कुस्ती खेळणा-या 11 पैलवानांना कासारसिरसी येथील बसवन्ना ग्रुपच्या वतीने सत्कार करून ढाल बक्षीस देण्यात आली. तसेच कासार सिरसी येथील सर्व माजी सैनिकांचा सत्कार करून बसवन्ना ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी श्री करीबसवेश्वर मठाचे मठाधिपती मुरुगेंद्र महास्वामी, पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख, पोलीस उपनिरीक्षक गजानन शिरसागर, यात्रा समितीचे प्रवीण होळकुंदे, सचिन कडतने, वीरेशचिंचनसुरे, किरण शीलवंत, मोनेश्वर पांचाळ, मयूर गबुरे, योगेशचिंचनसुरे, पिंटू विजापूरे शिवय्या मठपती आदी उपस्थित होते. या कुस्ती सामन्यांचे समालोचन महादेव मेहेकरे व प्रेमचंद विजापुरे यांनी केले. यावेळी कासारसिरसी पोलीस ठाण्याचे सपोनि रियाज शेख, पोउपनि गजानन क्षीरसागर, व पोलीस कर्मचा-यानी बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS