Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादळी पावसामुळे आंब्याचे नुकसान

जळकोट प्रतिनिधी - भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळकोट तालुक्यात दि 14 एप्रिलच्या संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वा-यासह पा

लातूर अर्बन को-ऑप बँकेला 20.75 कोटी नफा
तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी
सीमावर्ती भागातील गावांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा

जळकोट प्रतिनिधी – भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जळकोट तालुक्यात दि 14 एप्रिलच्या संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वा-यासह पाऊस झाला यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . तसेच डोंगरगाव येथे शेतात बांधलेल्या म्हशीवर वीज पडून म्हशीचा जागीच मृत्यू झाला. जळकोट तालुक्यात झालेल्या वादळी वा-यामुळे तालुक्यातील आतनूर व शिवारात शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा व पाऊस होऊन केशर आंब्याचे झाडे मोडून पडले असून आंब्याचे खूप नुकसान झाले आहे. यासोबत हळद वाढवणा परिसरामध्ये देखील सोसाट्याचा वारा सुटला. जळकोट मधील सुनील अवलवार यांच्या शेतातील देखील आंब्याचे नुकसान झाले. यासोबतच डोंगरगाव परिसरात वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला यामध्ये सुरज खंबाळे यांची म्हैस शेतामध्ये झाडाखाली बांधली होती. रात्रीच्या सुमारास वीज म्हशीच्या अंगावर पडली व म्हशीचा जागीच मृत्यू झाला यामुळे सदरील शेतक-याचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . सदरील शेतक-याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महेश सातापुरे यांनी केली आहे.

COMMENTS