लातूर प्रतिनिधी - श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, आय.क्यु.एस.सी. व माजी विद्यार्थी
लातूर प्रतिनिधी – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, आय.क्यु.एस.सी. व माजी विद्यार्थी संघटना, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 एप्रिल 2023 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांची प्रसंगीकता या विषयावर महाविद्यालयाच्या समाजकार्य/वाणिज्य इमारत सेमिनार हॉलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक अॅड.श्रीकांतप्पा उटगे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.कल्याण कांबळे, प्राचार्य डॉ.सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, संयोजक डॉ.सदाशिव दंदे, डॉ.उमा कडगे, परीक्षक ओमशिवा लिगाडे, प्रा.राहुल इंगळे, डॉ.शशिकांत देवनाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना डॉ.सदाशिव दंदे म्हणाले की, मागील 37 वर्षापासून विभागीय स्तरावर वादविवाद स्पर्धा आयोजित केली जात होती. सन 2012-13 पासून ही स्पर्धा राज्यस्तरीय करण्यात आली यावर्षीपासून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या स्पर्धेचा हेतू म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपरातील विद्यार्थ्यांना वैचारिक हक्काचे विचारपीठ मिळावे हा असल्याचे ते म्हणाले . उद्घाटकीय मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड म्हणाले की, महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासू प्रवृत्तीचा विकास होतो तसेच सभेमध्ये वक्तृत्व कौशल्य विकसित होते तेव्हा स्पर्धकांनी अशा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये केवळ माहिती न देता त्याची सांख्यिकी आकडेवारी सुद्धा द्यावी असे ते म्हणाले. यावेळी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात मागील 37 वर्षापासून महात्मा फुले राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच नेतृत्व गुणांचा विकास व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे ते म्हणाले. उद्घाटन समारंभाचा अध्यक्षीय समारोप करताना संचालक अॅड.श्रीकांतप्पा उटगे म्हणाले की, महात्मा फुले यांचे कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते सर्व विश्वव्यापी आहे त्यांच्या प्रत्येक विचारांमध्ये समाजातील सर्वसामान्य व्यक्ती असल्याचे सातत्याने दिसून येते महात्मा ज्योतिराव फुले यांनी सातत्याने आयुष्यभर दीनदुबळ्यांच्या कल्याणाचा विचार केला आहे तेव्हा ही स्पर्धा आपल्या महाविद्यालयामध्ये संपन्न होता याचा मला सर्वस्वी आनंदा असून त्यांनी सर्व स्पर्धकाला शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या समारोप आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. कल्याण कांबळे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आदर्श हा संपूर्ण विश्वासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कुटुंबापेक्षा समाजातील गोरगरीब आणि दुर्लक्षित घटकांचा सातत्याने विचार करून शिक्षण हे मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. या स्पर्धेमध्ये राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर येथील प्रमोद दत्तात्रय घोडके याला प्रथम पारितोषिक रुपये 4001, एल.बी.एस.कॉलेज, सातारा येथील मिथुन दत्तात्रय माने याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 3001, राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर येथील कु.प्रतीक्षा बळीराम मोरे हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 2001 आणि महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील कु.सपना दिलीप पांचाळ हिला उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 1001 पारितोषिक आणि सर्व स्पर्धकांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून स्मृतिचिन्ह देऊन एम.आय.टी.वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी मयूर नाणेकर यांना देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम निकम यांनी केले तर आभार किसनाथ कुडके यांनी मानले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आय.क्यु.एस.सी.चे समन्वयक डॉ.आनंद शेवाळे, संयोजन समितीतील सदस्य डॉ.बाळासाहेब गोडबोले, डॉ.दीपक चाटे, डॉ.संजय गवई, डॉ.विनायक वाघमारे, प्रा.व्यंकट दुडिले, प्रा.रूपाली हलवाई, प्रा.केशव बिरादार, प्रा.प्रभाकर इगवे, प्रा.शिवानंद स्वामी, अॅड.इरफान शेख, डॉ.शितल येरुळे, डॉ.सचिन हंचाटे आणि प्रा.सुरेंद्र स्वामी आदींनी परिश्रम घेतले.
COMMENTS