Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय बंजारा परिषदेची धुर प्रा.पी.टी.चव्हाणांच्या खांद्यावर

राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड; बंजारा समाज बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव

बीड प्रतिनिधी - बंजारा समाजातील एकमेव अधिकृत असलेल्या राष्ट्रीय बंजार परिषद संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पदाच मान बीड जिल्ह्याच्या मातीतील कणख

अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचे खासगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन
राष्ट्रवादीत पक्ष आणि चिन्हासाठी संघर्ष
 राजकारणी आणि उद्योगपतींची मैत्री असण्यात गैर काय? – चंद्रशेखर बावनकुळे

बीड प्रतिनिधी – बंजारा समाजातील एकमेव अधिकृत असलेल्या राष्ट्रीय बंजार परिषद संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पदाच मान बीड जिल्ह्याच्या मातीतील कणखर नेतृत्व असलेल्या सामाजाचे बुलंद बोफ म्हणून सर्व परिचीत असलेले माजी जि.प.सदस्य प्रा.पी.टी. चव्हाण सर यांच्या खांद्यावर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष तथा समन्वयक किसनभाऊ राठोड यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या हितासाठी कायम संघर्ष करत लढा देत असल्याने प्रा.पी.टी. चव्हाण सर यांच्या कामाची राष्ट्रीय बंजारा परिषदेने विशेष दखल घेत त्यांच्या खांद्यावर संपूर्ण संघटनेची धुरा देण्यात आली आहे. कायम समाजाच्या हितासाठी तसेच तांड्यावरील बंजारा समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी शासन प्रशासन दरबारी आंदोलन, मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचे काम प्रा.पी.टी.चव्हाण सर करत असतात. दमदार बाना, उच्च विचारश्रेणी, स्पष्ट बोली भाषा आणि उत्कृष्ट वक्तृत्वाच्या जोरावर बंजारा समाजाचे बुलंद तोफ म्हणून सर्वपरिचीत आहेत. राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रा.पी.टी.चव्हाण सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे तमाम बंजारा बांधवांकडून शुभेच्छा दिल्या जात असून पुढील काळात समाजाच्या हितासाठी आणखी जोमाने काम करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
समाजाच्या हितासाठी आणखी जोमाने काम करणार
गेल्या अनेक वर्षापासून अहोरात्र समाजाचे हित जोपासत बंजारा समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी काम करत आहे. याचेचे हे फळ असून समन्वयक किसनभाऊ राठोड यांनी माझ्यावर येवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वास टाकला आहे. त्या विश्वासाला तडा जावू देणार नसून पुढील काळात आणखी जोमाने काम करणार असल्याचे मत प्रा.पी.टी.चव्हाण सर यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS