Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांनी शांततेत वहीवाट काढून द्यावी

देवणी प्रतिनिधी - देवणी तालुक्यात शेतक-यांनी शांततेत वहीवाट काढून द्यावी दिवाणी न्यायालयात दावे व याचिका दाखल करून एकमेकांचा वेळ व पैसा खर्च करू

जागृती शुगरच्या संचालकपदी बालाजी बिराजदार यांची निवड
पालघरच्या डहाणू डॅममध्ये तिघे बुडाले
नांदेड शहरातील डॉ. आंबेडकर नगरासह अन्य भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

देवणी प्रतिनिधी – देवणी तालुक्यात शेतक-यांनी शांततेत वहीवाट काढून द्यावी दिवाणी न्यायालयात दावे व याचिका दाखल करून एकमेकांचा वेळ व पैसा खर्च करून, तसेच कायमस्वरूपी वैमनस्याची भावना वाढवून भांडण-तंटे करीत बसण्यापेक्षा, सामंजस्य व सामोपचाराने रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एकजूट दाखविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन निलंगा येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी केले. देवणी तालुक्यातील नकाशावरील शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करणे व मजबुतीकरण करणे बाबत सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, तलाठी व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी हे मत मत व्यक्त केले. शेतक-यांनी गाव नकाशावर असणारे 100 टक्के रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, एवढेच नाही तर ज्या रस्त्यावरून अनेक पिढ्या जात आहोत असे वहिवाटीचे रस्ते देखील रुंदीकरण करून कायमस्वरूपी मजबुती करण्यासाठी प्रस्तावित करावेत असे आवाहन केले. यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे गटविकास अधिकारी सोपान अकेले, नायब तहसीलदार विलास तरंगे, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही एस कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शेख, भूमी अभिलेख विभागाच्या श्रीमती पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तडखळकर व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपाभियंता नागेश स्वामी यांच्यासह देवणी तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक व शेतकरी यांची उपस्थिती होती.

COMMENTS